School Closed : पुण्यात ७ तालुक्यात शाळा बंद; मुंबईसह ठाणे, नाशिक, पालघर आणि नवी मुंबईतही शाळा बंद!

Mumbai Pune Thane schools closed due to heavy rain tomorrow : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्यातील काही तालुक्यांमध्ये उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
School Closed Tomorrow
School Closed Tomorrow
Published On

Maharashtra Rain Alert, School Closed Tomorrow : महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केले असून हवामान खात्याने दिलेल्या ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्या ७ जुलै रोजी मुंबई (BMC), ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकमधील सर्व शाळा-कॉलेजेस पूर्णपणे बंद राहतील. तसेच पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा वाढता जोर पाहता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे कडक आवाहन केले आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, 'या' ७ तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला दिलेल्या अतिवृष्टीच्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या ७ तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना उद्या (मंगळवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट असल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

School Closed Tomorrow
School Closed : शाळा, कॉलेजना उद्याही सुट्टी, मुंबईसह ५ ठिकाणी निर्णय; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना

मुंबईत शाळांना सुट्टी, खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम'चा सल्ला

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटांसाठी हवामान विभागाने (IMD) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मंगळवारी (७ जुलै) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व शाळा बंद राहणार आहेत.खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' (WFH) लागू करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी हवामानाच्या इशाऱ्याची नोंद घेत खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात उद्या सर्व शाळा, कॉलेज बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय!

ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या 'ऑरेंज अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून उद्या, मंगळवार दिनांक ७ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

७ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy to very heavy rainfall accompanied with strong winds) इशारा देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकाप्रशासनाने मंगळवार ७जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले आहेत.

School Closed Tomorrow
BREAKING: ऑपरेशन टायगर पुन्हा होणार का? आमदाराला २० कोटींच्या ऑफरचा दावा, उद्धव ठाकरेंनी बोलवली इमर्जन्सी बैठक

नवी मुंबईत शाळांना सुट्टी -

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना उद्या, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे एक खोटे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तातडीने स्पष्टीकरण जारी केले आहे. उद्या शाळांना सुट्टी देण्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि पालकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नमुंमपाच्या शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी केले आहे.

पालघरमध्ये उद्या शाळा-कॉलेज बंद

हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला उद्या (मंगळवारी) मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता नागरिकांनी सतर्क राहावे आणि विनाकारण प्रवास करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे उद्या शाळा-कॉलेज बंद

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांना उद्या (मंगळवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे तात्काळ आदेश दिले आहेत. हवामानाची बिघडती स्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सरकारी सूचनांचे पालन करावे.

नाशिकमध्ये उद्या सर्व शाळा आणि आठवडे बाजार बंद

नाशिकला ढगफुटीचा इशारा देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात उद्या शाळा आणि आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहतील. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन नियोजन पूर्ण केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

School Closed Tomorrow
School Closed : शाळा, कॉलेजना उद्याही सुट्टी, मुंबईसह ५ ठिकाणी निर्णय; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना

राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.

मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)पथके पुर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी २ आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी १ पथके मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण ६ सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी २ आणि नांदेड, गडचिरोली पथके तैनात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com