School Uniform: जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा होणार? दीड महिन्यानंतरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविना

Maharashtra School News: राज्यातील 44 लाख विद्यार्थी अद्याप गणवेशाविना आहेत. शाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र दिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा होणार? दीड महिन्यानंतरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविना
School UniformSaam tv
Published On

शाळा सुरू झाल्या... मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले... मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचा शब्द देणाऱ्या शासनाने दीड महिना उलटला तरीही गणवेश दिला नाही. राज्यातील काही शाळा वगळता ६५ हजार शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र दिन साजरा करावा लागणार असल्याचे दिसते आहे.

कापड आले असे सांगितले जात असले तरी ते शाळांपर्यंत कधी पोहोचणार अन् कपडे शिवून विद्यार्थ्यांना कधी मिळणार, याबाबतची साशंकता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप नव्या शैक्षणिक वर्षात गणवेश मिळाला नाही. राज्यातील इतर जिल्ह्यांतही हीच परिस्थिती आहे.

जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा होणार? दीड महिन्यानंतरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविना
Black Turmeric Viral Video : काळ्या हळदीने उघडतं बंद कुलूप? काळ्या जादूसाठी कोट्यवधींची डील? व्हायरल Video मागचं सत्य काय?

काय आहे योजना?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याची ही योजना आहे. ४ मार्च २०२४ला विद्यार्थ्यांच्या मापानुसार कापड पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी प्रतिगणवेश ११० रुपये शिलाई खर्च घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे ठरले. मात्र, बचत गटांना ११० रुपयांत गणवेश शिवून देणे शक्य नसल्याची अडचण पुढे आली.

जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा होणार? दीड महिन्यानंतरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविना
Supreme Court On SC ST Sub Category : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! SC, ST तील उपवर्गीकरणाला मंजुरी, कोणाला मिळणार लाभ?

विधानसभा अधिवेशनातही विरोधकांनी शालेय गणवेशाच्या मुद्यावरुन सत्ताधा-यांवर निशाणा साधलाय. खुद्द मुख्यमंत्र्यांनी गणवेश देण्यावरुन आणि कापडाच्या गुणवत्तेवरुन सभागृहाला आश्वस्त केलं होतं.

दुसरीकडे विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात गणवेश आणून दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान अद्याप गणवेश मिळाला नसल्यानं मुलांबरोबर पालकांचाही हिरमोड झाला आहे. सरकार कोणत्या मुहूर्तावर गणवेश देणार हे पहायचं....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com