Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी

Pune ST Bus Accident: आहिल्यानगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी एसटी बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले.
Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची एसटी बस उलटली

  • ओतुर येथे घडली अपघाताची घटना

  • अपघातामध्ये १५ विद्यार्थी जखमी

  • बसमध्ये ५३ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक होते

रोहिदास गाडगे, पुणे

शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. आहिल्यानगर- कल्याण महामार्गावर ओतुर येथे ही घटना घडली. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात गुरूवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आहिल्यानगर जिल्ह्यातून जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसला अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर, लेण्याद्री परिसरात सहल येत होती. यावेळी ओतुरजवळ चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हाईडरला धडकली त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. अहिल्यानगर- कल्याण महामार्गावरील खामुंडी गावाच्या हद्दीत ही घटना घडली.

Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी
Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग....; ६ जणांचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विद्यार्थींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालक देखील होते. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी
Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com