School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Schools Closed In Palghar And Raigad: पालघर आणि रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा इशारा दिला.
School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Schools Closed In Palghar and RaigadSaam Tv
Published On

राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. उद्याचा दिवस देखील महत्वाचा असणार आहे. भारतीय हवामान खात्याने पालघर आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि रायगडमध्ये आज देखील अतिवृष्टी होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्थव त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यासह वसई -विरार शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार वापरण्याचे निर्देश दिले आहेत

School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Rain Alert: पुढचे ७ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार; महाराष्ट्रासह २० राज्यांना इशारा

तसंच, अतिवृष्टीची तीव्रता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुट्टीबाबत निर्णय घ्यावा. तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गरजेनुसार ऑनलाइन वर्गांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

तर, रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच अंगणवाड्याना उद्या ६ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

School Holiday: सर्व शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, रायगड- पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास अतिधोक्याचे, मुंबई-कोकणला ऑरेंज,रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com