Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास अतिधोक्याचे, मुंबई-कोकणला ऑरेंज,रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट

Monsoon Rain Alert: भारतीय हवामान विभागाने रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाट क्षेत्रांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर मुंबई आणि कोकणसाठी 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Monsoon Rain Alert:
MAHARASHTRA RAIN ALERT: RED ALERT FOR RAIGAD, PUNE & NASHIK GHATS; ORANGE ALERT FOR MUMBAI AND KONKANsaam tv
Published On
Summary
  • दोन दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  • मुंबई आणि कोकणसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगड, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी

  • भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, पुणे, नाशिक घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचले असून रस्त्याना नदीचं स्वरुप आले आहेत. त्याच भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

Monsoon Rain Alert:
Raigad Flood: अंबा नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका; 28 जणांचं थरारक रेस्क्यू, व्हिडिओ व्हायरल

हवामान विभागाने रायगड तसेच पुणे-नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Monsoon Rain Alert:
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचे तांडव! मुंबई-ठाण्यासह ४ जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', ९ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार

रायगडमध्ये पावसाचा हाहाकार

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले असून मोठी वाहतूक कोंडी झालीय. वाकण आणि नागोठणेदरम्यान असलेल्या हॉटेल गुलमोहरजवळ कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आलाय. अनेक गावांतील भातशेती पाण्याखाली गेली आहे. नदीकाठावरील स्मशानभूमी आणि वीटभट्ट्यांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com