School Closed : विदर्भात पावसाचा हाहाकार! 'या' जिल्ह्यांत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Gadchiroli Heavy Rain Alert School Closed Update : गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी आणि सिरोंचा तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
GADCHIROLI HEAVY RAIN: SCHOOLS, COLLEGES & ANGANWADIS CLOSED IN THREE TALUKAS DUE TO TORRENTIAL RAIN
GADCHIROLI HEAVY RAIN: SCHOOLS, COLLEGES & ANGANWADIS CLOSED IN THREE TALUKAS DUE TO TORRENTIAL RAINSaam Tv
Published On
Summary
  • गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस

  • गडचिरोलीतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी

  • सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम

  • हवामान विभागाचा पुढील काही तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा

गणेश शिंगाडे , गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज पहाटेपासूनच जिल्ह्यात जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून काही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे

GADCHIROLI HEAVY RAIN: SCHOOLS, COLLEGES & ANGANWADIS CLOSED IN THREE TALUKAS DUE TO TORRENTIAL RAIN
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

पावसाचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागात जाणवत असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरस्थिती आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

GADCHIROLI HEAVY RAIN: SCHOOLS, COLLEGES & ANGANWADIS CLOSED IN THREE TALUKAS DUE TO TORRENTIAL RAIN
Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असल्याने नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा सखल भागांमध्ये जाणे टाळावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com