साताऱ्याच्या राजकारणात खळबळ, झेडपीच्या ३ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय?

Satara ZP members disqualification case : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत व्हिप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी याचिका दाखल झाली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
Satara ZP controversy
Satara ZP controversySaam TV Marathi
Published On

ओंकार कदम | साम टीव्ही मराठी | सातारा प्रतिनिधी

Satara ZP controversy, NCP members disqualification : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात राडा झाल होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ जिल्हा परिषद सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे समोर आहे. 'सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळी 'व्हिप'चे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता करणे सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे अँड दत्तात्रय घोडके यांनी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे व्हिप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने ही कायदेशीर लढाई सुरू करण्यात आली आहे. ३ सदस्यांविरोधात याचिका दाखल कऱण्यात आल्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.

Satara ZP controversy
Baramati : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं बारामतीमधून अधिकृत उमेदवारी मागे घेतली

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व सदस्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा 'व्हिप' जारी केला होता. मात्र, पक्षाचा आदेश डावलून तीन सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. त्यांनी भाजप च्या उमेदवाराला मतदान केले. यामुळे 'महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम'नुसार या सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली आहे.

Satara ZP controversy
डेव्हिड मिलरला अश्रू अनावर! दिल्लीला शेवटच्या २ चेंडूंत २ धावा हव्या होत्या; पण गुजरातने जबड्यातून विजय हिसकावला, व्हिडिओ व्हायरल

ॲड दत्तात्रय घोडके यांनी तीन सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता करणे यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी लवकरच संबंधितांना नोटीस बजावतील आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो न्याय देतील, असा विश्वास अँड.दत्तात्रय घोडके व्यक्त केला आहे.

Satara ZP controversy
धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; व्हिडिओ शूट होत असतानाही थांबला नाही, विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com