Satara: ऑफलाईन नकाे ऑनलाईन परीक्षा घ्या; 'वाय सी' च्या विद्यार्थ्यांची मागणी

एसटी प्रवासात पैसे वाचतात परंतु आत्ता खासगी प्रवासी वाहनातून यावे लागते. त्याचा खर्च परवडत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.
exam
examSaamTV
Published On

सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी आज दुपारच्या सुमारास महाविद्यालय परिसरात एकत्र आले. यावेळी सर्वांनी अचानक महाविद्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. आमच्या महाविद्यालयाने (college) ऑफलाईन परीक्षेचा (offline exam) निर्णय मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन असल्याचे काहींनी सांगितलं.

या आधी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (exam) घेतली जाणार असल्याचे आम्हांला सांगितलं हाेते. तशा पद्धतीची नोटीस देखील लावण्यात आली हाेता. मात्र हा निर्णय अचानक बदलण्यात आला. दरम्यान ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी (students) आज आक्रमक झाले हाेते.

exam
Breaking News : सिंधूदुर्गात नितेश राणेंना आज मिळाला अंशत: दिलासा

सातारा (satara) जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बंद असलेली बस सेवा यामुळे यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी वर्गाने केली आहे. एसटी प्रवासात पैसे वाचतात परंतु आत्ता खासगी प्रवासी वाहनातून यावे लागते. त्याचा खर्च परवडत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

exam
Australian Open 2022: डॅनियल कॉलिन्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत; बार्टीशी लढत
exam
Dehu: स्मिता चव्हाण की पूजा दिवटे; NCP काेणाला करणार नगराध्यक्ष; उत्सुकता शिगेला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com