मावळ : देहू नगरपंचायत (dehu nagar panchayat) नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती (scheduled caste) महिलेसाठी (women) राखीव ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या (ncp) दोन नगरसेविका नगराध्यक्षा पदासाठी पात्र आहेत.
स्मिता चव्हाण आणि पूजा दिवटे यांच्यापैकी एका नगरसेविकेला नगराध्यक्ष पदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीसह (nagar panchayat) राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष (mayor) पदासाठी नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
देहू (dehu) नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.