संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी
Maharashtra Hingoli outrage after Satara case : मुंबईतील काळाचौकी, साताऱ्यातील फलटणमध्ये महिलांवर झालेल्या आत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. फलटणमध्ये महिला डॉक्टराने आत्महत्या करण्याआधी पीएसआयने बलात्कार केल्याचं हातावर लिहिले. राज्यात खाकीवर संताप व्यक्त केला जात असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
हिंगोलीमध्ये महिलेवर बलात्कार झाला, तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पण पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांनी महिलेचा अपघात झाल्याची नोंद करत रूग्णालयात पाठवले. पोलिस आणि आरोग्य विभागाचा असंवेदनशीलपणा पुढे आल्यानंतर हिंगोलीत संतापाची लाट उसळली.
हिंगोलीत शेतात जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून ३५ वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औंढा पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून औंढा पोलिसांनी आता अत्याचार करणाऱ्या या आरोपीला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे काल (शुक्रवार) सायंकाळी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हाच दाखल केला नाही. औंढा उपजिल्हा रुग्णालयाचा असवेदनशीलपना देखील पुढे आला आहे, औंढा उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण सांगत या महिलेला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. दरम्यान आरोपी हा मध्य प्राशन केलेला होता आरोपीने महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात ओढत घेऊन जात अतिप्रसंग केला आहे.
धक्कादायक म्हणजे औंढा पोलिसांनी या महिलेच्या अत्याचाराची तक्रार घेण्याऐवजी चक्क या महिलेचा अपघात झाला असून तिच्यावर उपचार व्हावे असे पत्र औंध उपजिल्हा रुग्णालयाला दिले होते. त्यामुळे औंढा उपजिल्हा रुग्णालयात अत्याचार झाल्या संदर्भात तपासण्या करणे ऐवजी डॉक्टरांनी या महिलेवर फक्त उपचार केले. मात्र आज सकाळी प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसताच पोलिसांनी पुन्हा एकदा हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र देत महिलेच्या अंगावर अत्याचार करताना झालेल्या जखमांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे कळवले आहे. त्या मुळे कायद्याचे रक्षक असलेल्या औंढा पोलिसांचा असंवेदनशीलपना पुढे आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.