Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

Kolhapur Kagal giant wheel stuck for 5 hours : कोल्हापुरात कागल ऊरूसात मोठा थरार घडला. जायंट व्हील पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने १८ नागरिक तब्बल पाच तास आकाशात अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्वांना सुखरूप खाली उतरवलं.
Kolhapur Rescue News
Kolhapur Rescue NewsSaam TV Marathi news
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Kolhapur Rescue News : कोल्हापूरमधील कागलमधल्या जत्रेत जायंट व्हील पाळण्यातून तब्बल 5 तासांनी नागरिकांची सुटका करण्यात आली. श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसात शुक्रवारी रात्री जायंट व्हील पाळणा उंचावर अडकला होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाळणा बंद पडला होता. त्यात 18 नागरिक होते. कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानं त्यांना सुखरूप खाली उतरवलं. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पाच तास १८ जण आकाशात मृत्यूशी झुंज देत होते.

कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ऊरूसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला आणि त्यात बसलेले १८ नागरिक तब्बल 5 तास अडकून राहिले. कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने त्यांना सुखरूप खाली उतरले. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. ऊरूसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी तत्काळ पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच ऊरूस कमिटीचे सदस्यही तातडीने मदतीला पोहोचले.

Kolhapur Rescue News
Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर मनपा अग्निशमन दल व रेस्क्यू पथक बोलावण्यात आले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाळण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे पाळणा बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळेवर पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पालिका प्रशासनाकडे याची परवानगी घेतली होती का याचेही चौकशी सुरू आहे. साडेआठच्या सुमारास हा पाळणा कॅपॅसिटीच्या वर गेल्यावर लॉक झाला. हा लॉक काढण्याचे पाळणा मालकाकडून प्रयत्न सुरू होते, पण लॉक निघालं तर तिथून सरळ अडीच ते तीन फूट खाली येऊन दुसऱ्या लॉक मध्ये तो पाळणा अडकला असता आणि हा माणसांचा झोला पाळण्याला सहन होईल की नाही ही शंका त्या मालकांना आली आणि त्यातून त्यांनी दुसरा काय प्रयोग करता येईल काय याची चर्चा सुरू केली.

Kolhapur Rescue News
IND vs AUS playing 11 : अर्शदीपला बाहेरचा रस्ता, कुलदीपची एन्ट्री; शुभमनची सैना क्लीन स्वीप टाळणार का?

दरम्यान येथील आनंद हेगडे यांनी पालिकेचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांना फोन करून सदरची कल्पना दिली. बाळासाहेब माळी यांनी कोल्हापूर महानगर पालिकेचे फायर ऑफिसर मनीष रणभिसे यांना संपर्क साधून मदतीची आव्हान केले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांना सदरच्या घटनेची कल्पना दिली बाळासाहेब माळी यांनी तत्परतेनेही कार्यवाही केली. त्यानंतर मनीष रणभिसे यांनी जिल्हाधिकारी यांची विशेष परवानगी घेऊन सुमारे दीडशे फूट लांब जाणारी टर्न टेबल लायडर ही क्रेन तातडीने कागलकडे पाठवून दिली. या पाळण्यात महादेव लक्ष्मण पाटील (गोकुळ शिरगाव ), श्रेयस अमर धनवडे ( कणेरी मठ ), अर्चना महादेव पाटील (गोकुळ शिरगाव ), प्रणव संजय साऊळ ( कागल ), आवलीश माळी ( पुणे ), अमर धनवडे ( कणेरी ), समन्यू गिरीष ठोंबरे ( कागल ), पूनम संतराम बांबुगडे ( कागल ), निहिरा सचिन कारळे ( कागल ), शिवानी श्रीकांत सूर्यवंशी (कागल ), हर्षद शिवाजी साऊळ ( कागल ), शुभांगी अमर धनवडे ( कठोरी मठ ), अभिषेक मिलिंद शहा ( कागल ), ओमकार पांडूरंग सुतार ( कागल ) , साहिल शब्बीर माणगावकर ( निपाणी ), पृथ्वीराज महादेव पाटील ( गोकुळ शिरगांव ), सहिल रफिक ( उत्तर प्रदेश ) , काशिनाथ अत्तार ( निपाणी) आदींचा समावेश होता.

Kolhapur Rescue News
भरधाव कारने ८ जणांचा चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com