भरधाव कारने ८ जणांना चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

agra car accident : आग्रामध्ये महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने आठ जणांना चिरडल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
Uttar Pradesh Highway Crash Five Killed
Uttar Pradesh Highway Crash Five Killed
Published On

Uttar Pradesh Highway Crash Five Killed : उत्तर प्रदेशमध्ये एका भरधाव कारने ८ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. आग्रामधील महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कार चालकाला अटक केली आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी कऱण्यात येत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

शुक्रवारी एका भरधाव कारने दुचाकीसह रस्त्यावर चालणाऱ्या अनेकांना चिरडले. या दुर्दैवी अपघातामध्ये पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. टाटा नेक्सन कारने शुक्रवारी रात्री महामार्गावर अनेकांना चिरडले. कारने एका घराबाहेर बसलेल्या लोकांना जोरदार टक्कर दिली, त्याशिवाय दुचाकीलाही उडवले.

Uttar Pradesh Highway Crash Five Killed
Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

जमावाची चालकाला बेदम मारहाण -

या भीषण अपघातात ८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना गंभीर अवस्थेत एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उपचारावेळी पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव जमला. त्यांनतर कार चालकाला बेदम मारहाण झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले अन् चालकाला अटक केली.

Uttar Pradesh Highway Crash Five Killed
६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

आग्रा येथील नागला बुधी येथे झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर त्वरित उपचार करण्याचे त्यांनी निर्देश दिले. आग्रा पोलिसांनी पाच जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली आहे आणि जिल्हा प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

Uttar Pradesh Highway Crash Five Killed
Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com