Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार

Bhandara political leaders join Congress Nana Patole speech : भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाना पटोले आणि खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Nana Patole
Nana PatoleSaam tv
Published On

शुभमन देशमुख, भंडारा प्रतिनिधी

Congress joining event in Bhandara with BJP and Sena leaders : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात काँग्रेसलमध्ये मोठी इनकमिंग झाली आहे. भंडाऱ्यातील ठाकरेंची शिवसेना, भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार प्रशांत पडोळे उपस्थित होता. नाना पटोले यांनी भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसमध्ये अभिनंदन केले. त्याशिवाय बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयाचा विश्वास केला.

नाना पाटोलेंच्या उपस्थितीत अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

नाना पाटोले यांच्या उपस्थितीत अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना (ठाकरे), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. तर काँग्रेसची भंडाऱ्यात ताकद वाढली आहे. या पक्ष प्रवेशामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकारण फिरणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी होऊ शकतात. त्याआधी काँग्रेसची तकद वाढली आहे.

Nana Patole
भरधाव कारने ८ जणांचा चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

काँग्रेसची ताकद वाढली -

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्यात अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी भंडारा शहर अध्यक्ष अरविंद पडोळे हे त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले. यासोबतच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांनी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातोय.

Nana Patole
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

..तर त्याच्या घरात घुसून मारू, नाना पटोलेंचा दम

सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोर येईल, त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर, त्याच्या घरात घुसून मारू, असा इशारा नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. काँग्रेसमुक्त भारत करू अशा नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. त्यामुळे अनेक आलेत, अनेक गेलेत मात्र, काँग्रेस पक्ष संपू शकला नाही असं म्हणत नाना पटोलेंनी भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सज्जड दम दिलाय.

Nana Patole
Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com