Satara : फलटणमध्ये ‘कोयता गँग’चा थरार, गाड्या फोडत भररस्त्यात तरुणांचा धुडगूस

Satara Crime News : फलटण शहरातील जिंती नाका परिसरात कोयता गँगच्या दहशतीचा CCTV व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हातात कोयते घेऊन तरुणांनी भररस्त्यात धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
SICKLE GANG CREATES PANIC IN PHALTAN CCTV VIDEO GOES VIRAL
SICKLE GANG CREATES PANIC IN PHALTAN CCTV VIDEO GOES VIRALSaam Tv
Published On
Summary
  • फलटणमध्ये ‘कोयता गँग’ची दहशत; जिंती नाका परिसरात घटना

  • तरुणांनी हातात कोयते घेऊन भररस्त्यात धुडगूस घातला

  • CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

ओंकार कदम, सातारा

फलटण शहरात पुन्हा एकदा ‘कोयता गँग’ची दहशत पाहायला मिळाली असून जिंती नाका परिसरात काही तरुणांनी भररस्त्यात कोयता उगारून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंती नाका परिसरात सायंकाळ च्या सुमारास काही तरुणांनी हातात कोयते घेऊन रस्त्यावर धुडगूस घातला. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. काही वाहनचालकांनीही भीतीपोटी आपला मार्ग बदलल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

SICKLE GANG CREATES PANIC IN PHALTAN CCTV VIDEO GOES VIRAL
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

व्हिडिओमध्ये काही युवक हातात कोयते घेऊन उभे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे फलटण शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित तरुणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

SICKLE GANG CREATES PANIC IN PHALTAN CCTV VIDEO GOES VIRAL
Shocking : भयंकर! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या पतीने काढला काटा; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून शहरात वाढत्या गुंडगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फलटण शहरात वाढत चाललेल्या ‘कोयता गँग’च्या हालचालींमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com