साताऱ्यात भाजपला जोरदार धक्का! शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या खेळीने जिल्हा बँकेत नवी समीकरणे, पाहा कुणाची झाली निवड?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील अध्यक्ष, तर शिंदेसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी निवडून आले.
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
Satara Bank ElectionSaam Tv
Published On: 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बँकेत सर्वाधिक ९ संचालक निवडून आलेले असतानाही भारतीय जनता पक्षाला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले आहे.

बँकेच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे ९, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ८ आणि शिवसेना शिंदे गटाचे ४ सदस्य विजयी झाले होते. संख्याबळ जास्त असल्याने बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र, निवडणुकीच्या प्रक्रियेत मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ४ अशा एकूण १२ सदस्यांची मोट बांधत बहुमताचा आकडा गाठला. या बदललेल्या संख्याबळामुळे भाजपने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बँकेच्या निमित्ताने शंभूराज देसाई यांनी या नव्या समीकरणाची जुळवाजुळव केल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी "आगे आगे देखो होता है क्या?" असे सूचक विधान केले आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर महायुतीमधील वाद चव्हाट्यावर

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधत, "दम होता तर जिल्हा परिषदेप्रमाणे स्वतंत्र लढायचे होते, जखम भरून निघण्यासाठी अघोरी विद्या वापरली तर त्याचे गंभीर परिणाम होतात," असे म्हणत डिवचले आहे.

जयकुमार गोरे यांचे शंभूराज देसाईंना खडे बोल:

सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह महायुतीसोबत शिवेंद्रराजे महाराज भोसले होते. त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली गेल्यामुळे याविषयी शिवेंद्रराजेंनाच अधिकृत माहिती आहे, असे म्हणत गोरे यांनी संपूर्ण जबाबदारी शिवेंद्रराजेंकडे ढकलली. तसेच, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका वेगळ्या असून ही निवडणूक शेवटची नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण होणार, नवीन नावही ठरलं, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नाराजी

या सर्व आरोप-प्रत्यारोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खंत व्यक्त करत नेत्यांना संयमाचा सल्ला दिला आहे. वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबत अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. फलटण आणि खंडाळ्यातील अपयशाची जबाबदारी आपण स्वतः घेत असून जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनीही ती स्वीकारावी, असे ते म्हणाले.

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिंदेंसेनेचे पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.