शिवीगाळ, बघून घेण्याची भाषा; DCC च्या मतदान प्रक्रियेत तणाव

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मतदान सुरु झाले आहे.
jawali voting center
jawali voting center

सातारा : सातारा (satara) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेवेळीस थोडा तणाव पाहायला मिळाला. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे. दरम्यान कराड तालुक्यात शांततेत मतदान सुरु आहे.

jawali voting center
DCC त राजे बिनविराेध; 'एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज'

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मतदान jawali voting center सुरु झाले आहे. जावळी तालुक्यात आज सकाळच्या प्रहरी दाेन्ही उमेदवारांचे समर्थकांमध्ये मतदान केंद्रानजीक उभे राहण्यावरुन वादावादी झाली.

दरम्यान दाेन्ही गटातील उमेदवारांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर काही काळ कार्यकर्ते शांत झाले. पाेलिसांनी देखील दाेन्ही गटातील नेत्यांना शांततेचे आवाहन केले. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पाेलिसांना सहकार्य केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com