Satara Crime: आल्याच्या शेतात भलताच उद्योग... शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

Satara News Update: सातारा तालुक्यातील खोजेवाडीमधील शेतकऱ्याचा हा प्रताप पाहून पोलिसही चक्रावून गेले.
Satara Crime News
Satara Crime NewsSaam Digital
Published On

Satara Crime News:

आल्याच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यामधून समोर आला आहे. सातारा तालुक्यातील खोजेवाडीमधील शेतकऱ्याचा हा प्रताप पाहून पोलिसही चक्रावून गेले. या प्रकरणी संबंधितास अटक करत पोलिसांनी 27 लाखाचा गांजा जप्त केला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा तालुक्यातील खोजेवाडीमध्ये (Khojewadi) लहु कुंडलिक घोरपडे यांनी आपल्या आल्याच्या शेतात गांजाची झाडे जोपासल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Satara Crime Branch) पोलिसांना मिळाली होती. या माहितेच्या आधारे पोलीस पथकाने शेतात जाऊन पाहणी केली.

यावेळी शेतामध्ये गांजाची झाडांची लागवड केल्याचे आढळुन आले. पोलीस पथकाकडून 18 गांजाची झाडे ताब्यात घेवुन त्याचे वजन केले असता ते 109 किलोग्रॅम इतके भरले. तसेच या जप्त करण्यात आलेल्या जगांजाच्या झाडांची किंमत 27 लाख 34 हजार 500 रुपये असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Satara Crime News
Beed Political News: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; माजी मंत्र्याची कार फोडली

या प्रकरणी संंबंधित शेतकऱ्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात (Borgaon Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओमकार यादव, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara Crime News
Ahmednagar: मूर्ती लहान पण किर्ती महान! ९ वीतल्या विद्यार्थिनीचा प्रयोग यशस्वी, एसटी प्रवशांसाठी बनवली वेबसाईट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com