Ahmednagar: मूर्ती लहान पण किर्ती महान! ९ वीतल्या विद्यार्थिनीचा प्रयोग यशस्वी, एसटी प्रवशांसाठी बनवली वेबसाईट

Student Create Website: बसेसच्या वेळापत्रकास प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या सुविधा आणि योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिलीय.
Ahmednagar
AhmednagarSaam TV
Published On

सचिन बनसोडे

Ahmednagar News:

नववीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीने स्वतःच्या संकल्पनेतून एक क्यूआर कोड बनवलाय. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करताच एसटी बसच्या वेळापत्रकासह प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या सुविधा आणि योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. अहमदनगरच्या कोपरगाव बस आगारात तिच्याच हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा )

Ahmednagar
Viral Food Video: सीताफळातील बिया काढण्याची झंझट मिटली; अनोखा जुगाड असलेला VIDEO व्हायरल

कोपरगाव शहरातील साईश्रद्धा अरविंद सालमुठे ही इयत्ता नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. विविध दुकानातील क्यूआर कोड पाहून आपणही एखादं क्यूआर कोड बनवावं ज्याने नागरीकांना काहीतरी सुविधा उपलब्ध होईल अशी संकल्पना तिच्या मनात आली. तिने एक वेबसाईट तयार केली असून कोपरगाव बस आगारातील बसेसच्या वेळापत्रकास प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या सुविधा आणि योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिलीय.

चार महिने कष्ट घेऊन तिने आपले शिक्षक आणि ईतर तज्ञ लोकांची मदत घेउन हे क्यूआर कोड बनवले आहे. क्यूआर कोड बस स्थानक चौकशी केबिन आणि बसमध्ये लावण्यात आले आहे.

साईश्रद्धाने तयार केलेल्या क्यूआर कोड आणि वेबसाईटमुळे एसटी प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कोपरगाव बस आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी तिच्या या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.साईश्रद्धा लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील इतर आगारासाठी देखील वेबसाईट बनवणार आहे.

या कामाचं सर्व श्रेय तिचं स्वतःचं आहे. तिने वेळोवेळी आमच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन घेतले. आम्हीही तिला प्रोत्साहन देत योग्य मार्गदर्शन केलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेबसाईट बनवत तिने मोठं काम केलं असल्याचे साई श्राद्धाचे शिक्षक महेश मोरे यांनी म्हटले आहे.

साईश्रद्धाचा स्वभाव पहिल्यापासून ॲक्टीव्ह आहे. तिने या वेबसाईटचे काम सुरू केले तर ती लवकरच पूर्ण करेल अशी आम्हाला शाश्वती होती. कमी वयात तिने केलेल्या या कार्याचं कौतुक वाटत असून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील अरविंद सालमुठे यांनी दिलीय.

साईश्रद्धाने कमी वयातच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत नागरिकांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या वेबसाईट आणि क्यूआर कोड संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिची ही संकल्पना नक्कीच पथदर्शी ठरेल एव्हढं मात्र नक्की.

Ahmednagar
Government Scheme For Students : राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना; 20 रुपयांत मिळणार 5 लाखांपर्यंत फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com