Viral Food Video: सीताफळातील बिया काढण्याची झंझट मिटली; अनोखा जुगाड असलेला VIDEO व्हायरल

Viral Video: अशातच सोशल मीडियावर सीताफळातील बिया सोप्या पध्दतीनं कशा काढाव्यात हे सांगितले आहे.
Viral Food Video
Viral Food VideoSAAM DIGITAL
Published On

Viral Food Video

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील बरेच व्हिडीओ फूड ब्लॉगचे असतात. तर काही स्वयंपाक घरातील किचन टीप्सचे असतात. ज्यामुळ स्वयंपाक करताना आपले काम लवकर होऊ शकते. अशातच सोशल मीडियावर सीताफळातील बिया सोप्या पध्दतीनं कशा काढाव्यात हे सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Food Video
Borivali Station Video: बोरीवली स्थानकातील धडकी भरवणारा VIDEO, ट्रेनच्या २७० फेऱ्या रद्द झाल्यानं चेंगराचेंगरीसदृश स्थिती

आपल्यापैकी सगळ्यांचा विविध फळे खाण्यास भरपुर प्रमाणात आवडतात. पण अशी काही फळं असतात की, त्यात जास्त प्रमाणात बिया असतात. त्यामुळे अनेकजण फळ खाण्यास टाळाटाळ करतात. त्यातील एक फळ म्हणजे सीताफळ. सीताफळात बिया भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे सुद्धा सीताफळ नीट खाता येत नाही. अशातच सीताफळाच्या बिया काढणारी एक अनोखी पद्धत सध्या चांगली चर्चेत आली आहे. नक्की ही पध्दत कशी आहे हे आपण पुढील व्हायरल व्हिडीओतून पाहुयात...

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या व्हिडीओत सुरुवातीस एक सीताफळ दाखवले आहे, त्यानंतर त्या सीताफळातील बिया काढताना दिसत आहे. बिया काढून झाल्यानंतर त्यांना चॉपरमध्ये टाकतात. चॉपरच्या साहाय्याने सीताफळातील बिया सोप्या पध्दतीनं वेगळ्या झाल्यात.

@aaj_kayy_specialया इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तसंच हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकानां सीताफळ खाणं हे अवघड जाणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, 'सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कश्या काढाव्यात?'.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्यात. एका युजर्सनी म्हटलय की, 'या पेक्षा हाताने खाल्लं तर बर होईल ' तर आणखी युजरने लिहिलेय,'माझं अडीच वर्षांचा मुलगा हाताने सीताफळ खातो आणि बिया पण काढून टाकतो' अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रियायावर आल्या आहेत.

Viral Food Video
Rain In AC Local Train: भर उन्हात एसी लोकलमध्ये पाऊस आला तरी कुठून? माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केला VIDEO,एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com