Breaking News : घाटात दरड काेसळली; सातारा महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस बंद

पर्यटक, भाविक तसेच वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
Saam breking
Saam brekingSaam Tv

Satara Breaking News : सातारा जिल्ह्यातील केळघर घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मेढा मार्गे महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकदार, पर्यटकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. (Latest Marathi News)

सातारा जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी पाऊस झाला. जिल्ह्यातील सातारा, पाचगणी, महाबळेश्वर येथे सकाळच्या सुमारास पाऊस (rain) पडला हाेता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. रात्री पुन्हा काही भागात पाऊस झाला. (Breaking Marathi News)

Saam breking
Kass : तिढा सुटला; राजेंची मागणी मान्य, कास पठार ई बस 'येथून' धावणार

दरम्यान आज (शुक्रवार) सकाळी केळघर घाटात दरड काेसळली. यामुळे सातारा मेढा मार्गे महाबळेश्वर रस्ता बंद झाला. नवरात्र निमित्त प्रतापगडला देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मेढा मार्गे महाबळेश्वरला जात असतात. या भागात दरड काेसळल्याने घाटातील वाहतुक पुर्णत: बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक तसेच वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Saam breking
Pune : पुणेकरांनो ! इकडे लक्ष द्या, चांदणी चौक पूल पाडताना शहरातील 'या' मार्गावरील वाहतूक बंद
Saam breking
Sangli : दुचाकीवरुन तिघे आले अन् म्हसोबा मंदिराजवळील युवकाला भाेसकून गेले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com