

ओंकार कदम, प्रतिनिधी...
Satara Accident News: सातारा जिल्ह्याच्या सुर्याचीवाडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनाला जाताना गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Satara Accident)
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सुर्याचीवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला जात होते.
यावेळी खटाव ते मायणी सुर्याचीवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ओम्नी गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. (latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.