Walmik Karad : SITत वाल्मिक कराडचेच यार, तपास कसा होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

walmik karad news : बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केली. मात्र एसआयटीमधील अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध असल्यावरुन विरोधकांनी हल्लाबोल केलाय. कराडचे मित्रच जर एसआयटीमध्ये असतील निष्पक्षपणे चौकशी कशी होणार ?असा सवाल उपस्थित होतोय. पाहूया एक रिपोर्ट...
walmik karad  SIT
walmik karad Saam tv
Published On

बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली....तपासाला वेग आला....थेट खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या ७ पैकी सहा आरोपींना अटकही झाली...मात्र याचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होत असलेला आणि सध्या खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या वाल्किम कराडच्या एका फोटोवरून एसआयटीच्या संपूर्ण तपासावरच प्रश्वचिन्ह निर्माण झालंय. या फोटोमुळे एसआयची वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.

या एसआयटीतला अधिकारी पीएसआय महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो व्हायरल झालाय. त्यामुळे विरोधकांनी ही एसआयटीच बरखास्त करण्याची मागणी केलीय. आधी वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटच्या संबंधांवरून आधीच विरोधकांनी महायुतीला घेरलंय. त्यात आला हा फोटो आल्यामुळे आणखी वाद चिघळलाय.

walmik karad  SIT
Walmik Karad : वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप अॅपनिया' नेमका आजार काय? वाचा

सरपंच हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आक्रमकपणे भूमिका घेतली होती. लातूर, बीड, परभणी, पुणे येथे आक्रोश मोर्चामध्येही धस यांनी थेट मंत्री धनंजय मुडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धस यांनीही एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली आहे.

walmik karad  SIT
Suresh Dhas on Walmik Karad : गँग्स ऑफ परळीमुळे पुण्याचं नाव खराब होईल; संतोष देशमुख प्रकरणावरून सुरेश धस यांचा आक्रोश

संसदेतही हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. एव्हढं संवेदनशील प्रकरण असताना एसआयटीमध्ये प्रामाणिक आणि कर्त्यव्यकठोर अधिकाऱ्यांची नावे अपेक्षित होती. मात्र तसं काही झालं नाही. एसआयटीमधील अधिकारीच जर कराडचा दोस्त असेल तर चौकशीचा केवळ फार्स ठरेल. त्यामुळे आता गृहखात्याचीही जबाबदारी असलेले मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com