Maharashtra Politics: तुम्हाला गर्व चढला असेल तर युती करू नका; शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा

Sanjay Shirsat on Ajay Mishra Statement: गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या विधानामुळे आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.
Sanjay Shirsat Reaction on Ajay Mishra Statement over ajit pawar bjp maharashtra politics
Sanjay Shirsat Reaction on Ajay Mishra Statement over ajit pawar bjp maharashtra politics Saam TV
Published On

Maharashtra Political Latest News

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. राज्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे, असं विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

भाजप हा केंद्रात मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांना इतर जणांची गरज आहे. तुम्हाला सर्व पक्षांचे सहकार्य हवे. मोठ्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही, असं म्हणत संजय सिरसाट यांनी अजय कुमार मिश्रा यांचे कान टोचले आहेत. इतकंच नाही, तर तुम्हाला गर्व चढला असेल तर युती करू नका, असा इशाराही संजय सिरसाट यांनी भाजपला दिला आहे.  (Latest Marathi News)

Sanjay Shirsat Reaction on Ajay Mishra Statement over ajit pawar bjp maharashtra politics
Sharad Pawar News: रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

संजय सिरसाट (Sanjay Sirsat) यांनी बोलून दाखवलेल्या या नाराजीमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र, यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावरुन महायुतीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

अजय कुमार मिश्रा काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे रविवारी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महायुतीत सहभागी झालेत. पण महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्या पक्षाच्या सदस्यांची संख्या 18 कोटींवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागामुळे भाजपला काही फरक पडेल असे वाटत नाही, असं अजय कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर झालेल्या कारवाईवर देखील संजय सिरसाट यांनी भाष्य केलं. रोहित पवार यांच्या कारखान्यावर धाड आणि कारवाई ही नियमाने आहे. कोणत्या दोन बड्या नेत्यांमुळे कारवाई झाली त्यांची नावे घेतली पाहिजेत. शरद पवार यांना परिणाम माहित आहेत, म्हणून बोलणे टाळले, असा टोलाही संजय सिरसाट यांनी लगावला.

त्याचबरोबर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांना टार्गेट करण्याची पद्धत उबाठा गटाकडून घेतली आहे, अशी खोचक टीका देखील संजय सिरसाट यांनी केली. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार माझा आवडीचा नाही, तर सगळ्या नेत्यांच्या आवडीचा विषय आहे. मी केलेलं भाकीत खोटं ठरलं अस समजा. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून विचारेल की माझं भाकीत कधी खरं होईल, असंही सिरसाट म्हणाले.

Edited by - Satish Daud

Sanjay Shirsat Reaction on Ajay Mishra Statement over ajit pawar bjp maharashtra politics
Panjaka Munde News: मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं; पंकजा मुंडे यांनी सांगितला अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com