Sanjay Raut On Sharad Pawar: 'तीन दगडांवर पाय ठेवून कोणी राजकारण केलं तर त्याला जनता उत्तर देईल'; संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Political News: राष्ट्रवादीमधील या संभ्रमावर खासदार संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad PawarSaam tv
Published On: 

Political News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार आमचेच नेते आहेत असं त्यांनी म्हटलंय. अशात यावरुन महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांमध्ये संभ्रमाची भूमिका निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमधील या संभ्रमावर खासदार संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. (Latest Marathi News)

शरद पवारांवरील विश्वासार्हतेवरुन माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, " या विषयावर त्यांनी किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांनी उत्तरे द्यावीत. मी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका मांडली आहे. दोन दगडांवर, तीन दगडांवर पाय ठेवून कोण राजकारण करत असेल तर जनता त्याला उत्तर देईल." असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on Sharad Pawar
Maharashtra Politics: अजितदादांची घरवापसी होणार? शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेता स्पष्टच बोलला

माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, "शरद पवार हे मविआचे नेते आहेत. इंडिया आघाडी देशातील प्रमुख पक्षांची आहे. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात लढा देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे की नाही हे जनता ठरवेल. पण माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे,असंही संजय राऊतांनी म्हटलं.

पुढे अजित पवारांवर निशाणा साधत राऊत म्हणाले की, "ईडीच्या भीतीने अजित पवार भाजपसोबत गेलेत. अजित पवार यांची हकालपट्टी केली याला आम्ही फूट समजतो. शरद पवार यांचा मोठा गट मविआमध्ये आहे. देशपातळीवर भाजपचा पराभव करायचा हेच आम्ही ठरवलं आहे.", असं ठामपणे राऊतांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on Sharad Pawar
Political News : CM एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरुन राज्यपालांना मविआची १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com