Maharashtra Politics: अजितदादांची घरवापसी होणार? शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेता स्पष्टच बोलला

Atul Londhe on Sharad Pawar Statement: कदाचित शरद पवार यांचं वक्तव्य अजित पवार यांच्या घरवापसीचा पार्ट टू असेल, अशी शक्यता अतुल लोंढे यांनी बोलून दाखवली आहे.
Maharashtra Politics Congress Atul Londhe Reaction on Sharad Pawar Ajit Pawar Statement
Maharashtra Politics Congress Atul Londhe Reaction on Sharad Pawar Ajit Pawar Statement SAAM TV

Atul Londhe on Sharad Pawar Statement: अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी केलं होतं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केलं आहे. अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Politics Congress Atul Londhe Reaction on Sharad Pawar Ajit Pawar Statement
Shiv sena Crisis: ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी, १६ आमदार अपात्र प्रकरणात शिंदे गटाचा मोठा दावा

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार यांनी केल्या विधानाचा अर्थ सांगितला आहे.

"शरद पवार यांच्या विधानाने असं लक्षात येतं की, महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार पार्ट-2 बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे, शरद पवार यांनी असं स्पष्ट केलं आहे, की काहीही झालं तर मी भाजपसोबत जाणार नाही", असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

"आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे की नाही, हे निवडणूक आयोगाला ठरवायचे आहे. ही वैचारिक लढाई आहे. त्यामुळे संभ्रमावस्था ठेवून चालणार नाही, असे काँग्रेस आणि शिवसेनेने यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे आता एकच शक्यता उरते ती म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) परत येणार असतील. मग खरा चाणक्य कोण हे समजेल", असंही लोंढे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics Congress Atul Londhe Reaction on Sharad Pawar Ajit Pawar Statement
Maharashtra Politics: महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वात मोठा फटका; ठाकरेंना किती जागा मिळणार? सर्व्हे काय सांगतो?

कदाचित शरद पवार यांचं वक्तव्य अजित पवार यांच्या घरवापसीचा पार्ट टू असेल, अशी शक्यता अतुल लोंढे यांनी बोलून दाखवली आहे. शरद पवारांच्या या विधानाचा अजित पवार पार्ट-2 असा अर्थ काढला जात असल्याने येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार का? याकडेचं सर्वांचं लक्ष लागून आहे.

अजित पवारांवर बोलताना शरद पवार काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्व विचारला. त्यावर अजितदादा नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते.

पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com