तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut’s Explosive Jail Claim: आर्थर रोड जेलमध्ये असताना संजय राऊतांवर विष प्रयोगाचा प्रयत्न झाला होता. नेमका हा विषप्रयोग कुणी केला? यानंतर राहुल गांधींनी राऊतांना काय करण्याचा सल्ला दिला? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट..........
Sanjay Raut suspected poisoning attempt in Arthur Road Jail
Sanjay Raut suspected poisoning attempt in Arthur Road Jailsaam tv
Published On

ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. नेहमी विरोधकांवर टीकेची तोफ डागणाऱ्या संजय राऊतांनी आता मात्र एका मुलाखतीदरम्यान मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. तुरुंगात असताना आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा खळबळजनक दावा खासदार राऊतांनी केलाय. तसंच, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांतच गंभीर आजाराची लागण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.

विशेष म्हणजे राऊतांनी जेव्हा जेलमधून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींची भेट घेतली त्यावेळी त्यांना टॉक्सिक टेस्टचा सल्ला देण्यात आला. कारण त्यांच्यावर तुरूंगात विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. नेमकं काय गौप्यस्फोट केलाय राऊतांनी ते ऐकूयात...

एकीकडे, तपास यंत्रणांकडून विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू असताना संजय राऊतांनी पत्राचाळ जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात झालेल्या तुरुंगवासावरून विषप्रयोगाचा खळबळजनक दावा केलाय. इतकंच नव्हे तर राहुल गांधींच्या सल्ल्यामुळे 'टॉक्सिक टेस्ट'चा मुद्दाही राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलाय. त्यामुळे आता यावरून राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून आता काय वाद निर्माण होतो याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com