संजय गायकवाडांच्या मुसक्या शिंदे कधी आवळणार? वाचाळवीर आमदार भानावर कधी येणार?

Sanjay Gaikwad's Controversial Statement: संजय गायकवाडांनी शेतकरी आत्महत्येवरून वादग्रस्त विधान केल्यानं शिंदेसेनेवर शेतक-यांचा रोष वाढलाय... त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाडांच्या मुसक्या आवळणार का? शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील विधान करणाऱ्या गायकवाडांवर पक्षाकडून कारवाई होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
SANJAY GAIKWAD FARMER
SANJAY GAIKWAD FARMERsaam tv
Published On: 

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृतदेह जनावरांना खाऊ द्या, असा मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या या बेताल आमदारानं संपुर्ण शिंदेसेनेची पुन्हा एकदा नाचक्की केली. होय.. थेट लाजच काढलीये... दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी जो शेतकरी आत्महत्या करेल त्याच्या अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नका असा बिनडोक सल्ला देणाऱ्या या आमदारांमुळे शिंदेंच्या शिवसेनेची अक्षरशा लाज निघाली. आणि त्याच मुळे आता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट बेभान संजय गायकवाडांना फोन करून समज दिलीये.

खरं तर शिंदेसेनेचे संजय गायकवाड हे त्यांच्या कामापेक्षा थिल्लर वक्तव्यामुळे प्रसि्द आहेत. त्यामुळे याआधीही अनेकदा शिंदेंनी त्यांना ताकीद दिलीय. पण तरिही गायकवाड सुधरलेले नाहीत. राज्यातला शेतकरी आधीच संकटात आहे. बळीराजाच्या मरणावर असं वक्तव्य कुठल्याच परिस्थिती माफीस पात्र नाही. त्यामुळे त्यांच्या या पोकळ बडबडीवर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रीया आल्या आणि मग कारवाई होण्याची शक्यता दिसल्यानं आता संजय गायकवाडांनी नेहमी प्रमाणे आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेत दिलगिरीच्या पदराआड लपण्याचा प्रयत्न केला.

संजय गायकवाड आता दिलगिरी व्यक्त करून काही दिवस गप्प बसतील आणि पुन्हा कुठेतरी बडबडून चर्चेत येतील. कारण चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणं आणि हाणामारी करणं हाच जणू यांचा स्थायीभावच बनलाय. कधी आमदार निवासातील राडा, कधी प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी, कधी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला लाखांचं बक्षीस, तर कधी थेट फडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबायला निघालेल्या या गायकवाडांचे एक नव्हे तर शेकडो पराक्रम महाराष्ट्रानं पाहिलेत.

एका आमदाराच्या बेताल बडबडीमुळे थेट महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळतेय. एकीकडे शिंदेसेना शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देत असताना त्यांच्याच एका बेताल आमदाराने ही सगळी मेहनत एका झटक्यात पाण्यात घालवलीय त्यामुळे समजवूनही न समजणाऱ्याला समज देऊन भागणार नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करुनच वठणीवर आणण्याची वेळ आलीये. आता हे उपमुख्यमंत्री शिंदे कधी प्रत्यक्षात आणणार ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.