सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Sanjay Kaka Patil Declares Active Role in Upcoming Local Body Elections: विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर संजय काका पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. मेळाव्यात साथ सोडणार असल्याचे दिले संकेत.
Sanjay Kaka Patil
Sanjay Kaka Patil Saam
Published On
Summary
  • संजय काका पाटील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सक्रीय.

  • कार्यकर्ता हाच माझा पक्ष जाहीर केले.

  • आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली.

विजय पाटील, साम टिव्ही

अवघ्या काही महिन्यांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीलाही सुरूवात केली आहे. दरम्यान, सांगलीतील राजकीय वर्तुळातही घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संजय काका पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीत त्यांनी पराभवाचा सामना केला होता. दरम्यान, आता त्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत विकास महाआघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.

माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते संजय काका पाटील यांनी नुकतीच मोठी घोषणा केली. " कार्यकर्ता हाच माझा पक्ष" सांगली जिल्ह्यातील तासगाव येते कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून त्यांनी ही घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्यानंतर संजय काका पाटील पहिल्यांदाच कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे.

Sanjay Kaka Patil
म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

लोकसभेला भाजप पक्षाकडून खासदारकी लढवलेले संजय काका पाटील हे पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी विधानसभेला महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदारकी लढवली. मात्र, तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वर्गीय आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर संजय काका पाटील हे अलिप्त झाले होते.. मात्र पुन्हा एकदा संजय काका पाटील हे सक्रिय झाले आहेत.. आज सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे..

Sanjay Kaka Patil
दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

यावेळी संजय काका पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करत.. कार्यकर्ता हाच माझा पक्ष आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका निवडणुकीत 'विकास महाआघाडी'तर्फे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.. तर जिह्यातील अनेक नेते संपर्कात आहेत.. विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. मात्र येत्या आठ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याच ही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com