सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चरण येथे वारणा नदी काठावर मासेमारी करत असताना नदी (Sangli News) काटावरील शेतात भली मोठी मगर आढळून आली. स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तब्बल ७० किलो वजनाची मगर (Crocodile) पकडून गावात आणली. (Latest Marathi News)
सांगलीच्या चरण गावातील तरुण मासे मारीसाठी जात असतात. यावेळी वारणा नदी काटावरील मळी राणात मगर निदर्शनास आली. या तरुणांनी टीव्हीवर मगर कशी पकडतात हे त्यांनी पाहिले होते. त्याच पद्धतीने या सर्व तरुणानी मोठ्या धाडसाणी मगरीस पकड़ले. आणि मगरीच्या तोंडास, पाठीस व शेपटीला गुंडाळूण गावात आणले. ही मगर सहा ते साडेसहा फुट लांब आहे. यावेळी मगर पाहनयासाठी लोकाणी गर्दी केली होती.
वन विभागाच्या स्वाधीन
गाड्यावर मगरीस टाकून गावात आणून वन विभागाच्या ताब्यात दिले. वन खात्यातील अधिकाऱ्यांनी मगर चांदोली धरण परिसरात सोडून दिली. नदीमध्ये आणखी एक भली मोठी मगर आहे. त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती वन विभागाला करण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.