Sangli : कृष्णा नदीत पोहताना घडलं भयंकर; जलतरणपटूवर मगरीचा हल्ला

Sangli News : शरद जाधव यांच्यासह आणखी काहीजण रोज सकाळी नदीत पोहण्यासाठी जात असतात. त्यानुसार नेहमीप्रमाणे आज सकाळी कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. माई घाट येथे ते पोहण्यासाठी उतरले
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यातून वाहत असलेल्या कृष्णा नदीत काही जलतरणपटू रोज पोहण्यासाठी जात असतात. दरम्यान पोहत असताना नदीत आलेल्या मगरीने एकावर हल्ला केल्याची थरारक घटना आज सकाळी घडली आहे. सुदैवाने ताकदवान मगरीच्या जबड्यात अडकण्यापूर्वीच जलतरणपटूने आपली सुटका करून घेतली. यामध्ये एक जलतरणपटू जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सांगली शहरापासून जवळच असलेल्या कृष्णा नदी पात्रात पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीने हल्ला करत जखमी केल्याचे प्रकार घडला आहे. यात शरद जाधव असे जखमी झालेल्या जलतरणपटूचे नाव आहे. शरद जाधव यांच्यासह आणखी काहीजण रोज सकाळी नदीत पोहण्यासाठी जात असतात. त्यानुसार नेहमीप्रमाणे आज सकाळी कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. माई घाट येथे ते पोहण्यासाठी उतरले होते. ते सांगलीवाडीच्या बाजूने पोहत असताना जाधव यांच्यावर मगरीने हल्ला केला. 

Sangli News
Parbhani Heat Wave : परभणीत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून अलर्ट

सुटका करत पोहचले नदी काठावर 

मगरीने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर जाधव यांनी मोठ्या धाडसाने मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. यानंतर ते नदीच्या काठावर गेले. मात्र त्यांच्या पायाला मगरीच्या हल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तर त्यांच्यासोबत पोहायला येणाऱ्या काही तरुणांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Sangli News
Maval News : मावळ पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा असाही उपक्रम; सलग बारा तास वाचनातून महापुरुषांना अभिवादन

नदीत मगरीचे कायम वास्तव्य 

दरम्यान सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये वारंवार मगर आढळून येत असते. याठिकाणी मगरीचे कायम वास्तव्य असून दर आठ ते दहा दिवसाला मगर अनेकांच्या नजरेस पडत आहे. यातच आज मगरीने हल्ला केल्याने पोहण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे या मगरीचा बंदोबस्त त्वरित करावा; अशी मागणी जलतरणपटू आणि नागरिकांच्याकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com