Parbhani Heat Wave
Parbhani Heat WaveSaam tv

Parbhani Heat Wave : परभणीत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून अलर्ट

Parbhani News : गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नित्याचेच झाले आहे. यंदाही काही दिवसांपूर्वी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले असून तापमान स्थिरावले आहे
Published on

विशाल शिंदे

परभणी : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीला काही भागात अवकाळी पाऊस होत असल्याने तापमानात घसरण झाली आहे. मात्र काही भागात अजूनही तापमानाचा पारा चढताच आहे. यातच परभणी जिल्ह्यात सध्याचे तापमान ४० अंशाच्या वर गेले असून पुढील दोन दिवसात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार दोन दिवसांपासुन अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मात्र काही भागात तापमान हे ४० अंशाच्या वर कायम आहे. मागील आठवड्यात देखील पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहचला होता. मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. 

Parbhani Heat Wave
Sand Mafia : वाळूतस्करांची मुजोरी; तहसीलदारांच्या अंगावर नेला वाळूचा ट्रक, अमरावतीमध्ये खळबळ

पुन्हा उष्णतेची लाट 
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नित्याचेच झाले आहे. यंदाही काही दिवसांपूर्वी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले असून तापमान स्थिरावले आहे. तर आता पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊन तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

Parbhani Heat Wave
Lightning Strike : वडिलांसोबत घराकडे येताना घडले दुर्दैवी; वीज कोसळून मुलीचा मृत्यू, वडील जखमी

ग्लोबल वार्मिंगचा परिणाम 
तापमान वाढीला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कारणीभूत ठरत आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यात परभणीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवत असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे. पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट सांगितली जात असून तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

यामुळे तापतो मराठवाडा, विदर्भ
मराठवाडा व विदर्भात कुठेही समुद्र किनारा नाही. तसेच या दोन्ही विभागांत वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे मराठवाडा व विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे वाढणारे प्रदूषणही याला कारणीभूत ठरत असल्याचे डॉ. डाखोरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com