Lightning Strike : वडिलांसोबत घराकडे येताना घडले दुर्दैवी; वीज कोसळून मुलीचा मृत्यू, वडील जखमी

Murbad news : राज्यातील अनेक भागात मागील दोन- तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वारा गारपिटीसह पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv
Published On

मयुरेश कडव
मुरबाड
: राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. रविवारी मुरबाड तालुक्यात देखील गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचवेळी घराकडे जात असताना अंगावर वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. तर तिचे वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावातील रवीना सांडे (वय १८) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात मागील दोन- तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वारा तसेच गारपिटीसह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यानुसार रविवारी झालेल्या अवकाळी पावसात मुरबाड तालुक्यात वीज पडल्याची घटना घडली. 

Lightning Strike
IPL Match Betting : आयपीएल क्रिकेटवर सट्टा; जळगाव, यवतमाळमध्ये कारवाई, सात जणांना घेतले ताब्यात


रविवारी संध्याकाळी मुरबाड तालुक्यातील टोकावडे, धसई परिसराला गारपिटीने झोडपून काढले. धसई गावाजवळील अल्याणी गावातील १८ वर्षीय रवीना सांडे ही वडील राजाराम सांडे यांच्यासोबत अल्याणीहून धसईकडे जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरवात झाली असताना अचानक जोरदार आवाज होऊन वीज कोसळली. 

Lightning Strike
Sand Mafia : वाळूतस्करांची मुजोरी; तहसीलदारांच्या अंगावर नेला वाळूचा ट्रक, अमरावतीमध्ये खळबळ

वीज कोसळताच होत्याचे नव्हते झाले 

जोरदार आवाज होऊन रविना हिच्या अंगावर वीज पडली. यात ती गंभीररीत्या भाजली गेली होती. यानंतर तिला तत्काळ टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तर तिच्यासोबत असलेले तिचे वडील देखील यात गंभीरपणे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com