Sand Mafia : वाळूतस्करांची मुजोरी; तहसीलदारांच्या अंगावर नेला वाळूचा ट्रक, अमरावतीमध्ये खळबळ

Amravati News : प्रशासनांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर काही दिवस वाळू वाहतूक बंद राहते. नंतर पुन्हा चोरटी वाहतूक सुरु करण्यात येत असते. अशात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला केला जात असतो
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमरावती : वाळू तस्करांची मुजोरी थांबण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची सर्रासपणे चोरी केली जात आहे. अशातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळूतस्करांची मुजोरी वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक नेऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली असून सुदैवाने या प्रकारात तहसीलदाराला दुखापत झालेली नाही. 

नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यास मनाई आहे. असे असले तरी रात्रीच्या वेळी चोरून वाळूची वाहतूक केली जात आहे. प्रशासनांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर काही दिवस वाळू वाहतूक बंद राहते. नंतर पुन्हा चोरटी वाहतूक सुरु करण्यात येत असते. अशात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला केला जात असतो. अशाच प्रकारे अमरावतीमध्ये तहसीलदारांवर ट्रक नेत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भतकुली ते कोलटेक मार्गावर ही घटना घडली.

Amravati News
Vitthal Wari : विठुरायाची लंडन वारी; पालखी सोहळ्याचे प्रस्थान, ६५ दिवसांचा असणार प्रवास

दुचाकी उडविण्याचा प्रयत्न 

भातकुली परिसरात वाळूची अवैध तस्करी वा वाहतूक जोरावर सुरू आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर तहसीलदार अजितकुमार येळे, तलाठी सतीश बहाळे हे कारवाईसाठी गेले. याच वेळी पेढी नदीच्या पुलावरून स्मशानभूमि ते भातकुलीकडे जात असताना निंभावरुन अवैधरीत्या वाळूचा ट्रक येताना दिसला. त्या ट्रकवर क्रमांक सुद्धा नव्हता. तहसीलदार व तलाठी यांनी ट्रकचा पाठलाग केला. ट्रकचालक, मालक अतुल धंदर, व सूरज नागमोते यांनी ट्रक सूचनेनंतरही न थांबविता तहसीलदार व तलाठी यांच्या अंगावर नेऊन हत्येचाही प्रयत्न केला.

Amravati News
IPL Match Betting : आयपीएल क्रिकेटवर सट्टा; जळगाव, यवतमाळमध्ये कारवाई, सात जणांना घेतले ताब्यात

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

तर एकाने दुचाकी रस्त्यात अडवून, शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तहसीलदार अजितकुमार वसंत येळे (वय ५०) यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी संशयित ट्रक चालकासह अतुल धंदर (रा. निंभा) व सूरज नागमोते (वय ३५, रा. भातकुली) अशा तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com