Maval News : मावळ पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा असाही उपक्रम; सलग बारा तास वाचनातून महापुरुषांना अभिवादन

Maval Panchayat Samiti : मोबाईल युगात वाचनाकडे कर्मचाऱ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष आहे. वाचाल तर वाचाल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या वचनाचे तंतोतंत पालन करून अनोखा उपक्रम राबविला
Maval Panchayat Samiti
Maval Panchayat SamitiSaam tv
Published On

मावळ : महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. तर शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. मात्र वडगाव मावळ पंचायत समितीमध्ये आगळावेगळा असा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत सलग बारा तास वाचन करत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. 

आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाकडे कर्मचाऱ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे असेल नागरिकांचे दुर्लक्ष झालेले आहे. वाचाल तर वाचाल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या वचनाचे तंतोतंत पालन करून हा अनोखा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी सर्व पुस्तके पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने पुरविण्यात आले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सलग बारा तास वाचनाचा अनोखा उपक्रम यशस्वी केला आहे. 

Maval Panchayat Samiti
Lightning Strike : वडिलांसोबत घराकडे येताना घडले दुर्दैवी; वीज कोसळून मुलीचा मृत्यू, वडील जखमी

शासकीय कार्यालयात प्रथमच राबविण्यात आला उपक्रम 

वडगाव मावळ पंचायत समितीच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वाचनातून तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सलग बारा तास वाचन करून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच शासकीय कर्मचाऱ्यांनी वाचनातून केलेली आदरांजली आहे. 

Maval Panchayat Samiti
Parbhani Heat Wave : परभणीत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून अलर्ट

दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग 

मावळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवारचा सुटीचा दिवस असताना देखील शासकीय सुट्टी न घेता, सकाळी सहा वाजता पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा बारा तास वाचनाचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com