Sangli News : सांगली, मिरज कुपवाड महापालिकेची प्रशासकीय सभा चक्क कचरा डेपोवर पार पडली. महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने आज या कचरा डेपोचे रुपडेच पालटले आहे. यामुळेच महापालिकेने याच कचरा डेपोवरच प्रशासकीय सभा घेत स्वच्छतेचा एकप्रकारे संदेश दिला आहे. (Maharashtra News)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा डेपो बाबत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार केला. यामध्ये आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचऱ्याचा आणि कचरा डेपो मध्ये साठून असलेल्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला.
कचरा डेपो मधील कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने आज बेडग रोडवरील कचरा डेपोचे रुपडेच पालटले. घनकचरा प्रकल्पा अंतर्गत समडोळी रोड व मिरज- बेड रोड कचरा डेपोमधील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
या निविदेमध्ये दोन्ही डेपोमधील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी पुण्यातील कृष्णा ग्रीन एनव्हायरीन सोल्युशन या कंपनीची नियुक्ती केली. एकूण एकूण 56 एकरवर हा कचरा डेपो असून यातील 14 एकरवर कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला.
बेडग रोड कचरा डेपोमधील कचऱ्यावर 100% कामगिरी पुर्ण करून यातील जागा रिकामी करण्यात आलेली आहे. तसेच समडोळी रोड कचरा डेपोमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे. उर्वरीत कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा रिकामी करण्यात येणार आहे.
जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून निघणारे बायोसॉईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध केले जात आहे अशी माहिती महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.