पुण्यानंतर सांगलीत गोळीबाराचा थरार; बड्या नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या

sangli firing news : पुण्यानंतर सांगलीत गोळीबाराचा थरार घडला आहे. बड्या नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
sangli shocking
mathadi leader grand son deathSaam tv
Published On

पुण्यानंतर सांगलीत घडली गोळीबाराची घटना

गोळीबाराच्या घटनेने सांगलीतील संजय नगर हादरलं

१४ वर्षीय चिमुरड्याचा गोळीबारात मृत्यू

पुण्यातील सहकारनगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना आता सांगलीतही गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू १४ वर्षीय वेदांत मारुती बंडगर याच्या डोळ्यात गोळी घुसली. त्यामुळे वेदांतचा जागीच मृत्यू झाला आहे. सांगलीतील संजय नगरमध्ये राहणारे बाळासाहेब बंडगर यांच्या घरात 7 वाजल्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केला.

घरात असलेल्या १४ वर्षीय वेदांत याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराने परिसरामध्ये एकच खळबळ झाली आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संजय नगरमध्ये सहपोलीस अधीक्षक तुषार जोशी हे घटनास्थळी दाखल झाले.

sangli shocking
Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. तर व्यवसायिक वादातून ही घटना झाल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. संजय नगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

sangli shocking
पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या

वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेदांतचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांची आक्रोश पाहायला मिळत आहे.

sangli shocking
पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

पुण्यात तरुणावर गोळीबार

तत्पूर्वी, पुण्यातील सहकारनगरमध्ये शिंदे हायस्कूलजवळ बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका मेडिकलबाहेर थांबलेल्या व्यक्तीवर तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संबंधित तरुण जखमी झाला. या तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com