धक्कादायक! मुलाकडून वृद्ध आईचा गळा आवळून खून; त्यानंतर स्वत: केली आत्महत्या

माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे असे लिहिले आहे.
Police Station
Police StationSaam Tv
Published On

सांगली - आष्टा (Ashta) येथील दत्त वसाहतीमध्ये मुलाने आपल्या आजारपणाला कंटाळून वृद्ध आईचा गळा आवळून खून केला आहे. यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रतन रामचंद्र कांबळे वय ८० आणि त्यांचा मुलगा शशिकांत कांबळे वय ४७ पत्नी व दोन मुलांसह दत्त वसाहत येथे वास्तव्यास आहेत. शशिकांत याचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक (Teacher) होते. (Sangli Latest Crime News)

हे देखील पहा -

वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. शशिकांत याचे आष्टा शहरात दुकान आहे. मंगळवारी पत्नी व मुले माहेरी गेल्याने आई व शशिकांत दोघेही घरी एकत्र होते. शशिकांत याला दम्याचा आजार होता. यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला आणि दुसऱ्या खोलीत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

Police Station
Crime News: हंडरगुळी येथील तरुणाचा अपहरण करून खून; गुन्हा दाखल

यावेळी शशिकांत याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे असे लिहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com