Farmer Deshi Jugad: बाप लेकाचा देशी जुगाड; बनवलं आत्याधुनिक कोळपणी यंत्र, फवारणीही करता येणे शक्य

Sangamner News : बाप लेकाचा देशी जुगाड; बनवलं आत्याधुनिक कोळपणी यंत्र, फवारणीही करता येणे शक्य
Farmer Deshi Jugad
Farmer Deshi JugadSaam tv
Published On

सचिन बनसोडे

संगमनेर (अहमदनगर) : ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते. याचेच एक उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळालय. (Sangamner) संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी (Farmer) बापलेकाने आपला वडिलोपार्जित वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड देत कल्पनाशक्तीच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कोळपणी यंत्र बनवले आहे. (Maharashtra News)

Farmer Deshi Jugad
Jamner News: १५ एकरातील कपाशी फेकली उपटून; खत दिल्यानंतर फुलंच नाही

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील रामनाथ सोनवणे आणि समाधान सोनवणे या बापलेकाने आपला छोटासा वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत शेतकरी बांधवांसाठी ३० ते ३५ हजार रुपयांत अत्याधुनिक कोळपणी यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होणार असून शेतात कमी वेळात जास्त काम आणि पैशाचे देखील बचत होणार आहे. हे अत्याधुनिक (Ahmednagar) कोळपणी यंत्र बनवण्यासाठी त्यांना साधारणपणे २ महिन्याचा कालावधी लागला. या बापलेकाने बनवलेल्या बहुउपयोगी यंत्राची परिसरात चांगलीच चर्चा होत असून भविष्यात नांगरणी आणि पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना परवडेल असा अत्याधुनिक (Deshi Jugad) पद्धतीचा ट्रॅक्टर बनवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. 

Farmer Deshi Jugad
Jalna News: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची जालन्यात छापेमारी; भांग सदृश्य मादक पदार्थ केले जप्त

कोळपणीसोबत फवारणीही 

यंत्राला पुढच्या बाजूने ५ एच.पी.चे इंजन बसवले असून ते चालण्यासाठी दुचाकीप्रमाणे ऍक्सीलेटर सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. याद्वारे सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांची कोळपणी करता येणार आहे. त्याचबरोबर शेतात वाफे अथवा सरी पाडण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होणार असुन या यंत्रावर फवारणी मशीन देखील बसवणार असल्याचे सोनवणे बाप लेकाने सांगितल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com