Jamner News: १५ एकरातील कपाशी फेकली उपटून; खत दिल्यानंतर फुलंच नाही

१५ एकरातील कपाशी फेकली उपटून; खत दिल्यानंतर फुलंच नाही
Jamner News Cotton Crop
Jamner News Cotton CropSaam tv
Published On

जळगाव : तोंडापूर (ता. जामनेर) येथे सरदार अग्रो फर्टिलायझर गुजरात कंपनीचे खत दिलेल्या शेतातील कपाशीचे दोन महिन्याचे पिक फुले कळ्या येत नव्हत्या. (Jamner) यामुळे वैतागून अखेर (Farmer) शेतकरी सुधाकर पाटील यांनी १५ एकर श्रेत्रातील कपाशी उपटून टाकली आहे. आता कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. (Live Marathi News)

Jamner News Cotton Crop
School Bus Accident: विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला मोठा अपघात; ७ ते ८ विद्यार्थी गंभीर जखमी

तोंडापूर (ता. जामनेर) परिसरात कुंभारी बु., ढालगाव, ढालसिंगि, मांडवे, खांडवे, भारुडखेडा येथील १३५ शेतकऱ्यांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानात सरदार अर्गो फर्टिलायझर कंपनीचे सिंगल सुपर फास्फेट हे खत वापरले. यानंतर सुरुवातीला पिकाची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी सुधारणा करण्यासाठी विविध औषधीचा व खताचा वापर करून सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. कपाशीचे पिक वाढले, मात्र फुले कळ्या येत नसल्याने कपाशीची पाहिजे तशी वाढ होवून उत्पन्न होणार नाही. दरवर्षीप्रमाणे कापूस पिक येणार नसल्यामुळे तिनहि भावाच्या प्रत्येकी ५ एकर कपाशीच्या पिकाची १५ एकर पिक उपटून काढण्यात आले. चार बाय असलेल्या लावलेल्या कपाशीच्या आत मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. 

Jamner News Cotton Crop
Nashik ZP : जिल्हा परिषदेत प्लॅस्टिक बाटल्या वापरास बंदी 

शेतकऱ्यांना दिलेले खत अप्रमाणित 

दोन ते अडीच महिने होवून हि कपाशीच्या पिकात सुधारणा झाली नसल्याने व संबंधित ज्या कंपनीचे खत वापरण्यात आले, ते खत नाशिकच्या प्रयोग शाळेत जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांनी तपासणीसाठी पाठवले असता अप्रमाणित आढळून आले आहे. मात्र आजपर्यंत ज्या दुकानदारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्याकडून किंवा कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान झालेल्या शेतात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कपाशीच्या पिकांची पाहणी केली होती. त्याच शेतातील कपाशी शेतकरी सुधाकर पाटील व पद्माकर पाटील यांनी १५ एकर कपाशी शेतातून उपटून टाकली आहे. झालेल्या कपाशीच्या पिकाचे नुकसान दुकानदार व सरदार अग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनी गुजरात याच्याकडून मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com