Satara Pandharpur Highway : आषाढीचा याेग साधून संगम माहुली ग्रामस्थांनी राेखला सातारा पंढरपूर महामार्ग

पाेलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली.
Satara Pandharpur Highway, Satara News, Satara
Satara Pandharpur Highway, Satara News, Satarasaam tv
Published On: 

Satara News : सातारा कोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या संगम माहुली या गावच्या लोकांनी आज (गुरुवार) रास्ता रोको केला. गेली अनेक वर्षे या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे मोठे मोठे खड्डे या रस्त्यात पडले आहेत. त्यामुळे या भागात वारंवार अपघात (Accident) होत असतात. त्यात गावकरी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

Satara Pandharpur Highway, Satara News, Satara
Ambenali Ghat Landslide News : आंबेनळी घाटातील मेटतळेनजीक दरड काेसळली; पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस बंद

गेली अनेक वर्षे हा रस्ता जैसे थे परिस्थिती मध्ये आहे. या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आज ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. त्यांनी साधारण एक तास रस्ता अडवून धरला होता. आषाढी दिवशीच आंदाेलन झाल्याने सातारा पंढरपूर महामार्गावर वाहतुक ठप्प झाली. दाेन्ही बाजूच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Satara Pandharpur Highway, Satara News, Satara
Mumbai-Goa Highway Traffic Updates : मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु; हातखंबा ते निवळी रस्ता खचला

या वेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अखेर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. येत्या सहा जूलै अखेर रस्ता नीट न झाल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनास दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com