Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Sand Mafia Attack on Talathi : जळगावच्या चोपडा तालुक्यात बेकायदेशीर उत्खनन कारवाईदरम्यान वाळू माफियांनी एका तलाठ्यावर हल्ला केला. अधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून फेकून देऊन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
Sand Mafia Attack on Talathi
Sand mafia’s brutality exposed — Jalgaon Talathi attacked and nearly run over by tractor during anti-mining operation.file photo
Published On
Summary
  • चोपडा तालुक्यात वाळू माफियांनी तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केला.

  • ट्रॅक्टरवरून खेचून तलाठ्याला चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

  • अवैध वाळू उपशावर कारवाई करताना ही घटना घडली.

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांवर अनेकदा कारवाई करण्यात आली. मात्र तरीही वाळू माफियांची मुजोरी कायम आहे. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जळगावातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्याची कारवाई करण्यात येत होती. महसूल विभागाचे पथकाला त्या ठिकाणी काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसले. कारवाई करताना अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पसार झाले. मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला होता. पथकाच्या हाती लागलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यात येत होता.

Sand Mafia Attack on Talathi
Honey Trap: मोठी बातमी! बहीण-भावाचा हनी ट्रॅपचा प्लॅन; आमदाराशी मैत्री करत मोबाईलवर पाठवले अश्लील चॅट अन् व्हिडिओ

त्यावेळी ट्र्रॅक्टरवर जडे आडनावाचे तलाठी बसले होते. त्यावेळी चालक आणि मालकाने त्यांना ट्रॅक्टरवरून खाली खेचले. त्या दोघांनी तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तलाठी जडे यांना जोरदार मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Sand Mafia Attack on Talathi
Badnera Crime : बडनेऱ्यात ढाबा चालक, महिलेला मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

याबाबतची अधिकच्या माहितीनुसार, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा केला जात आहे, याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर ५ कर्मचारी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना काही वाहने दिसून आली पण अंधाराचा फायदा घेऊन काही वाहने तेथून पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती एक ट्रॅक्टर लागला. हा ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com