Badnera Crime : बडनेऱ्यात ढाबा चालक, महिलेला मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

Amravati News : व्हिडीओ बडनेरा येथील ठाणेदार यांना देण्यात आला असताना देखील ठाणेदारांनी आरोपींवर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे
Badnera Crime
Badnera CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: बडनेऱ्यात गुंडांकडून दादागिरी करत महिला व ढाबा चालकाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील राम मेघे इंजीनियरिंग कॉलेजच्या जवळ असलेल्या अजाबराव पाटील वऱ्हाडी धाब्यावर हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी बडनेरा येथील गुंड मयूर जगदीश कैथवास व त्याच्या सहकाऱ्यांनी ढाब्यावर येत ढाबा चालकाला व महिलेला चांगलीच मारहाण केली. तसेच वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुझा मर्डर करून टाकेल; अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Badnera Crime
Amravati : सोयाबीन काढणी करताना घडले दुर्दैवी; मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल 

दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर मारहाण झालेल्या ढाबा चालक व महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच सदरचा व्हिडीओ बडनेरा येथील ठाणेदार यांना देण्यात आला असताना देखील ठाणेदारांनी आरोपींवर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे. 

Badnera Crime
Amar Kale : किती आत्महत्या झाल्यावर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार?; खासदार अमर काळे यांची सरकारवर जोरदार टीका

संबंधितांवर दाखल आहे हत्येचा गुन्हा  

तर मयूर कैथवास याचेवर यापूर्वी देखील हत्या व हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्तांनी त्याचा तडीपारीचा देखील प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती आहे. मात्र या आरोपीला ठाणेदार व काही पीएसआय अभय देत असल्याने ढाबा चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्त याची दखल घेतली का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com