चेतन व्यास
वर्धा : एक वर्ष झाले मात्र अजून कर्जमाफी झाली नाही. महाराष्ट्र राज्यात अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर तुम्ही कर्जमाफी कराल? याच उत्तर आता शासनाने दिले पाहिजे. अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे खासदार अमर काळे यांनी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून सडकून टीका केली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत द्यावी तसेच संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी; अशी मागणी होत आहे. मात्र राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीचे पॅकेज तोडके आहे. शिवाय कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्यावरून खासदार अमर काळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलेले पॅकेज तोडकी मदत
पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. डोक्यावर असलेले कर्ज फेडीच्या चिंतेत शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि सरकार अजून झोपेत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलेले पॅकेज शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम न ठरता एक तोकडी मदत असल्याचा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आहे.
कुंभमेळ्याचे पॅकेज कमी करून मदत द्या
शक्तीपीठ महामार्ग नंतर केला तरी चालेल, पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला मदत द्या!. कुंभमेळ्याला कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी ते पैसे शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याचं पॅकेज कमी करा, शेतकऱ्याला दिलासा द्या, असा थेट सल्ला त्यांनी फडणवीस सरकारला दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.