Samruddhi Mahamarg Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर कारचा धडकी भरवणारा अपघात

Samruddhi Mahamarg Car Accident News: नागपूरवरून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन महामार्गावरच उलटली. या भीषण अपघातात कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले.
Samruddhi Mahamarg washim Car Accident News
Samruddhi Mahamarg washim Car Accident NewsSaam TV
Published On

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Car Accident News: बुलढाण्याजवळ झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर पुन्हा एका कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरवरून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन महामार्गावरच उलटली. या भीषण अपघातात कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले.

Samruddhi Mahamarg washim Car Accident News
Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; थरकाप उडवणारा VIDEO समोर

थरकाप उडवणारी ही घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतोष वाघमारे (वय20 वर्ष रा.जाफराबाद), निखिल वकोडे (वय 22 वर्ष) आणि सागर वाघमारे (वय 23 वर्ष) असं जखमी झालेल्या तरुणांची नावे आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारचा अक्षरशः चुरडा झाला आहे. (Latest News In Marathi)

Samruddhi Mahamarg washim Car Accident News
Shocking News: पोट दुखतंय म्हणून दोन्ही मुलींना रुग्णालयात नेलं; डॉक्टरांकडे तपासताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली

दरम्यान, पोलिसांना अपघातग्रस्त कारमध्ये दोन वेगवेगळ्या नंबरच्या नंबर प्लेट्स आढळून आल्या आहे. त्यामुळे या कारचा नेमका नंबर कोणता असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे डिझेल चोरटे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिकहून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रकचा बुलढाण्याजवळील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकला अचानक आग लागली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com