Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली

Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ भीषण साखळी अपघात झाला. ट्रकच्या धडकेनंतर ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident News AI Image
Published On: 

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुसरबीडजवळ अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना झाली. या अपघातात सुमारे ८ ते १० वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून एक ट्रक जात असताना त्याने समोर असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली. मात्र, वाहनांचा वेग जास्त असल्याने अनेक गाड्यांवर चालकांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे एकामागून एक वाहने एकमेकांवर धडकली. अशा प्रकारे महामार्गावर वाहनांची मोठी साखळी तयार झाली आणि हा अपघात घडला.

Samruddhi Mahamarg Accident News
Hair Fall : विशीतच केस पांढरे होताहेत? आजच करा 'हे' उपाय; महिनाभरात दिसेल चमत्कार

या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे पत्रे पूर्णपणे दबले असून काही वाहने एकमेकांवर चढल्याचेही दिसून आले. अपघाताची दृश्ये पाहता धडक किती जोरदार होती, याचा अंदाज येतो. मात्र, या मोठ्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Samruddhi Mahamarg Accident News
Transfer : पोलीस दलात मोठे फेरबदल! ३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे केली नियुक्ती ? जाणून घ्या

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेली वाहने बाजूला करण्याचे आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दरम्यान ही दिवसभरातील दुसरी घटना असून आज सकाळच्या सुमारास कोस्टल रोडवर ६ वाहनांचा विचित्र अपघात झालेला पाहायला मिळाला.या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.