Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघाताचा धोका वाढला, सोलार बॅटऱ्या चोरीला गेल्याने रस्त्यावर पसरला अंधार

Samruddhi Highway News: विजेचे बल्ब बंद झाल्याने रात्रीच्या वेळी पुलावर अंधार पसरला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
Samruddhi Mahamarg News
Samruddhi Mahamarg NewsSaam tv
Published On: 

Samruddhi Expressway News:

वाढत्या अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावरील लाईटिंग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गावरील अब्दीमंडी येथील सोलार ऑफ ग्रीड सिस्टिमच्या दोन लाखांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे समृद्धीवर अंधार पसरला आहे.

Samruddhi Mahamarg News
Buldhana Rain News: मुसळधार पावसाचा बुलढाणा जिल्ह्याला तडाखा! १२५ घरांची पडझड, ७६ जनावरे वाहून गेली

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) लायटिंगसाठी लावलेल्या सोलारच्या दोन लाखांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महामार्गावर अंधार पसरला आहे. महामार्गावरील अब्दीमंडी येथील सोलार ऑफ ग्रीड सिस्टिमच्या दोन लाखांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. विजेचे बल्ब बंद झाले असून रात्रीच्या वेळी पुलावर अंधार असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

समृद्धीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) हद्दीत जवळपास ५० पूल आहेत. त्यावर सोलार ऑफ ग्रीड सिस्टिमच्या माध्यमातून विजेची व्यवस्था केली आहे. एका सोलार सिस्टिमला अंदाजे आठ लाखांचा खर्च येतो. असे चार कोटी खर्चून ५० सोलार सिस्टिम समृद्धीवर बसवण्यात आले आहेत.

आता याच्या बॅटऱ्या चोरीला जात आहेत. छत्रपती संभाजीनगर ते धुळे महामार्गावरील दौलताबादच्या पाठीमागे अब्दीमंडी शिवारातील रस्त्यावर आठ बॅटऱ्यांची सोलार सिस्टिम बसवण्यात आली होती. एक बॅटरी अंदाजे ३० हजारांची आहे.

आठ बॅटऱ्यांची किमंत दोन लाख असून त्या चोरी गेल्या आहेत. त्यामुळे सोलार सिस्टिम बंद पडली आहे. समृद्धी महामार्गांची चार वर्षे देखभाल संबंधित कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून सोलार सिस्टिम बंद असूनही त्यांचे दुर्लक्ष आहे. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg News
Pune Accident News: पुण्यात भरधाव कारने शेतमजुरांना उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.