Pune Accident News 3 farmers died 2 injured in car collision Incident on Kalyan Ahmednagar highway
Pune Accident News 3 farmers died 2 injured in car collision Incident on Kalyan Ahmednagar highwaySaam TV

Pune Accident News: पुण्यात भरधाव कारने शेतमजुरांना उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Pune Accident News: शेतातील कामे उरकून घरी निघालेल्या ५ शेतमजुरांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.
Published on

अक्षय बडवे, साम टीव्ही

Kalyan Ahmadnagar Highway Accident

पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शेतातील कामे उरकून घरी निघालेल्या ५ शेतमजुरांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Pune Accident News 3 farmers died 2 injured in car collision Incident on Kalyan Ahmednagar highway
Budhana Accident News: नको ते धाडस करणं जीवावर बेतलं, रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कल्याण -अहमदनगर (Accident News) मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत.

सर्व मजूर हे कामाच्या शोधात पुण्यात आले होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८ च्या सुमारास मध्य परदेशातून आलेले हे ५ मजूर शेतातील कामे उरकून पायी घरी जात होते.

डींगोरे येथील दत्त मंदिरापासून जात असतांना यावेळी या मार्गाने भरधाव वेगात असलेली एक कार आली. यावेळी कारचालकाचे गडीवरील नियंत्रण अचानक सुटले. काही कळण्याच्या आतच या कारने मजुरांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

तर एकाचा दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच घटणस्थळाचा पंचनामा देखील करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Pune Accident News 3 farmers died 2 injured in car collision Incident on Kalyan Ahmednagar highway
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पावसाची संततधार ठरली गेमचेंजर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com