Sambhajinagar: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाळाचा जन्म, आईने १ लाखांना विकले; संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये भयंकर घटना घडली. १ महिन्याच्या बाळाची १ लाख रुपयांना विक्री करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.
Sambhajinagar: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाळाचा जन्म, आईने १ लाखांना विकले; संभाजीनगरमधील संतापजनक घटना
Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On: 
  • संभाजीनगरमध्ये बाळ विक्रीचा धक्कादायक प्रकार

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिन्याच्या बाळाची विक्री

  • आईने एक महिन्याच्या बाळाला १ लाख २० हजारांना विकले

  • मुकुंदवाडी बाळ विक्री प्रकरणात चौघांना अटक

  • लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या बाळाची विक्री

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने आपल्या पोटच्या बाळाची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपच्या संबंधातून महिलेने बाळाला जन्म दिला. अवघ्या एका महिन्याच्या निष्पाप बाळाला आईने १ लाख २० हजार रुपयांना विकले. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडीतल्या संजयनगरमध्ये घडलेल्या घटनेत स्वतः बाळाची आई या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मुकुंदवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर जन्मदात्यांसह खरेदीदार मायलेकींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. बाळाची ३६ वर्षीय आई गेली काही वर्षे मुंबईत वास्तव्यास होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती तिच्या पहिल्या मुलीला सोडून ३ वर्षापासून ३४ वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

Sambhajinagar: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाळाचा जन्म, आईने १ लाखांना विकले; संभाजीनगरमधील संतापजनक घटना
Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

महिलेचा प्रियकर देखील मुलगा आणि पत्नीला सोडून राहतो. तो दारूच्या आहारी गेला आहे. ३६ वर्षीय महिलेने ५ जुलै रोजी घाटी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. रुग्णालयातच तिची ओळख ६५ वर्षीय कौशल्या बारकू पवार (६५ वर्षे, राहणार संजयनगर) या स्वयंपाक काम करणाऱ्या महिलेसोबत झाली. तिने 'तुझा नवरा दारू पितो, तो तुझा आणि बाळाचा सांभाळ कसा करणार?' असा तिच्या मनात संशय निर्माण केला.

Sambhajinagar: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाळाचा जन्म, आईने १ लाखांना विकले; संभाजीनगरमधील संतापजनक घटना
Shocking: मध्यरात्री लॉजवर पोलिसांची धाड, २ महिलांना पुरूषांसोबत नको त्या अवस्थेत पकडलं

'माझी मुलगी सीमा अनिल रेशवाल (३३ वर्षे, रा. संजयनगर) बाळ विकत घेते. ते बाळ मला दे, आम्ही त्याचा नीट सांभाळ करू' असे सांगून कौशल्या पवार यांनी त्या दोघांना जाळ्यात ओढले. त्यानंतर कौशल्याच्या सांगण्यावरून बाळाच्या आईने आपल्या बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. तिने १ लाख २० हजारात त्यांची विक्री केली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी जन्मदात्या आईसह बाळाच्या खरेदीत सहभागी असलेल्या चौघांना अटक केली. या धक्कादायक प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे.

Sambhajinagar: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाळाचा जन्म, आईने १ लाखांना विकले; संभाजीनगरमधील संतापजनक घटना
Shocking : लॉजच्या बंद दाराआड सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com