Shreya Maskar
बॉलिवूड कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आता दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
काल (१९/९/२०२६) रोजी दीपिका-रणवीरला कन्यारत्न पात्र झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या जोडप्याने चाहत्यांना सुखद धक्क दिला आहे.
दीपिका-रणवीरच्या पोस्टमध्ये लक्ष्मीच्या पावलांचा फोटो दिसत आहे. तसेच त्यांनी लिहिलं की, "वेलकम बेबी गर्ल, १९/९/२०२६ ( दुआ, दीपिका व रणवीर) " कॅप्शनमध्ये 'नजर न लागे' (evil-eye) चा इमोजी शेअर केला आहे.
गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत असताना दीपिका-रणवीरच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. दीपिका-रणवीरने १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती.
दीपवीरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नवीन आयुष्यासाठी दोघांना शुभेच्छा देत आहेत.
दीपिका-रणवीरने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडच पॉवर कपल आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ८ सप्टेंबर २०२४ ला आपल्या पहिला बाळाला जन्म दिला. त्यांच्या आयुष्यात 'दुवा' नावाची गोंडस परी आली.
दीपवीरने एप्रिल 2026 मध्ये आपल्या दुसऱ्या प्रेगनेंसीची घोषणा केली. दीपिकाने दुवासोबत एक क्यूट फोटो टाकून गुडन्यूज चाहत्यांना दिली.