गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीला देखील महापूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे संभाजीनगर आणि जालना शहरासाठी आणि जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या गाव-शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Latest Marathi News)
त्याचबरोबर उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने सहा जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील ५० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
तर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील २० पैकी आठ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. आनंदाची बाब म्हणजे ८ मंडळांत १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. शिवाय खरीपातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस या मुख्य पिकासोबत इतर खरीपाची पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेल्याने हा पाऊस पडूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
केवळ पिण्याच्या पाण्याचं संकट सध्या टळलेलं आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासह (Jayakwadi Dam) १२ मोठ्या प्रकल्पांत ४५.९६ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे. मागील वर्षी याच कालावधीत ११ प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने थोडासा आधार मिळत आहे.
जायकवाडी धरण: ३७.९७ पाणीसाठा
सिद्धेश्वर धरण: ६४.४२ पाणीसाठा
मांजरा धरण: २४.११ पाणीसाठा
विष्णुपुरी धरण: ९१.३५ पाणीसाठा
निम्न दुधना धरण: २५.५० पाणीसाठा
माजलगाव धरण: १२.१८ पाणीसाठा
सीना कोळेगाव धरण: ०० पाणीसाठा
मानार धरण: ६५.८३ पाणीसाठा
येलदरी धरण: ६१.४८ पाणीसाठा
पैनगंगा धरण: ७२.७६ पाणीसाठा
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.